एसटीमधून उतरताना १ लाख ६० हजारांचे दागिने लांबवले

क्राईम धुळे निषेध माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी >>शहरातील शिवतीर्थ चौकात एसटीमधून उतरतांना महिलेचे दागिने लांबविण्यात आले. या दागिन्यांची किंमत एक लाख ६० हजार रुपये आहे.

साक्री रोडवरील मिनाई कॉलनीमधील रहिवाशी मोहीनी परेश बच्छाव ( वय २४) व त्यांच्या सासू या नंदुरबारवरुन धुळयाला आल्यात. शिवतीर्थ चौकात दोघी एसटी बसमधून उतरल्यात.

यावेळी पर्सवर त्यांची नजर गेली असता त्यावेळी सुमारे ४७ ग्रॅम वजन व एक लाख १७ हजार रुपये किंमत असलेली मंगलपोत, २० गॅम वजनाचा व ५० हजार रुपये किंमतीचा राणीहार त्यांना आढळून आला नाही. चोरटयांनी हे दागिने लांबविले होते.