मोटारसायकल घसरल्याने तरुण ठार

धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> जुने धुळे परिसरात मोटारसायकल स्लीप झाल्यामुळे तरुण ठार झाला. राकेश शिंदे असे मृत तरुणाचे नाव आहे.

जुने धुळे परिसरातील नदीपात्राजवळ असलेल्या रस्त्यावर मोटारसायकल स्लीप झाली. या अपघातात कुणाल रवींद्र जाधव (वय २१), राकेश नाना शिंदे (वय २१) हे जखमी झाले.

सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना हिरे रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राकेश याला मृत घोषित केले.

या प्रकरणी वीरेंद्र भरत काळे (वय २६) याच्या माहितीवरून आझादनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू हाेती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *