पैसे उसनवारीचा वाद ; तरुणावर कोयता, तलवारीने हल्ला

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> शहरातील चाळीसगाव रोड परिसरात पैसे उसनवारीच्या कारणावरुन तरुणावर कोयता, तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुमारे नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.

या प्रकरणी अयाज शेख गयासोद्दीन शेख ( वय ३१) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीनुसार, व्यवसायासाठी दहा हजार रुपये उसनवार दिले होते. हे पैसे परत मागितले. त्याचा राग आल्यामुळे मजहर शेख, अझर शेख, पप्पु शहा, अन्सारी नामक तरुण व इतर पाच ते सहा जणांचा जमाव चालून आला. त्यांनी तलवार, कोयता व लोखंडी पाईपने हल्ला चढविला.

तसेच ठार मारण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी चाळीसगाव रोड पाेलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरूवारी न्यायालयाने दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *