धुळ्यातील हिरे मेडिकल कॉलेजच्या समुपदेशकाला मारहाण

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे >> शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील हॉटेल वेलकमजवळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे समुपदेशक योगेश सुभाष खैरनार (वय ३४, रा.मोहाडी उपनगर) यांना तिघांनी मारहाण केली. मोटारसायकलजवळ काय करत आहात अशी विचारणा केल्याचा राग आल्याने योगेश खैरनार यांना गणेश साळवे, मोसीन इक्रामोद्दीन शेख व एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. तसेच त्यांची मोटारसायकल पेटवण्याचा प्रयत्न केला. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.