विनयभंगप्रकरणी पोलिस पाटलासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम धुळे

प्रतिनिधी धुळे/साक्री ::> तालुक्यातील बळसाणे शिवारात कुटुंबाला मारहाण करून महिलेचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी पोलिस पाटीलसह सुमारे ९ जणांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चौघांनी विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी ४५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मुलाचा गावातील बापू पाटील सोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर सायंकाळी पती व कुटुंबासह घरी असताना पोलिस पाटील अण्णा पाटील, विठ्ठल आत्माराम पाटील, बापू आत्माराम पाटील, आनाम अात्माराम पाटील व इतर पाच ते सहा जणाचा जमाव घरी आला. त्यांनी मुलगा तसेच पतीला मारहाण केली. यावेळी त्यांच्या बचावासाठी गेले असताना शिवीगाळ दमदाटी करण्यात आली. तसेच असभ्य वर्तन करून विनयभंग करण्यात आल्याची तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *