१० लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल

धुळे निषेध पाेलिस माझं खान्देश

धुळे >> देवपुरातील प्रभातनगर परिसरात माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी दहा लाख रुपयांसासाठी छळ करण्यात आला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचा पती अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यासंदर्भात २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तिच्या तक्रारीनुसार, माहेरून १० लाख रुपये आणावे असा तगादा सासरच्या मंडळींनी लावला होता. यातूनच पती विनोद किसन जाधव, विमल किसन जाधव, किसन गोघरू जाधव, मनोज किसन जाधव, अनिल किसन जाधव ( सर्व रा. शिवगंगा, अंबरनाथ, जि. ठाणे) यांनी छळ केला. अशी तक्रार दिली आहे. त्यावरून देवपूर पोलिस ठाण्यात छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.