चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली हस्तगत ; भामटा जेरबंद

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> दुचाकी चोरी प्रकरणी अटक केलेल्या संशयिताच्या ताब्यातील चोरीच्या चार मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्या. या प्रकरणी शहरातील मौलवीगंज, चांदतारा चौकातील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेल्या बोरसेनगरातून दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी चाळीसगावरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी शहरातील मौलवीगंज भागातील चांदतारा चौकातील मरकस मशिदीशेजारी राहणारा बिलाल अहमद नूर मोहंमद अन्सारी (वय ३४) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातील चार दुचाकी ( क्रमांक : एमएच-१८-एक्स-८३५८,एमएच-२०-के-२८२७, एमएच-४१-एम-९१२५, जीजे-०६-एन-५८४०) हस्तगत करण्यात आल्या. या प्रकरणी बिलाल अन्सारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.