मोटारसायकल घसरल्यामुळे जळगावातील तरुण अपघातात ठार

Jalgaon अपघात क्राईम जळगाव धुळे माझं खान्देश

धुळे >> तालुक्यातील मुकटी शिवारात मोटारसायकल घसरल्यामुळे जळगाव येथील तरुण रवींद्र भोई ठार झाला. याप्रकरणी वाहन चालकाच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथील रहिवासी रवींद्र दगडू भोई (वय ३२) व चिंतामण पंडित भोई हे दोघे मोटारसायकलने (एमएच-१९-डीएन-३१८१) जात होते. चिंतामण भोई हे सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत होते. त्यामुळे मुकटी शिवारात मोटारसायकल घसरली झाली. या घटनेत रवींद्र भोई ठार झाला.

याप्रकरणी मृत रवींद्रचा भाऊ सुदाम दगडू भोई यांनी दिलेल्या माहितीवरून चिंतामण भोई विरुद्ध धुळे तालुका पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.