धरणगाव पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन
धरणगाव ::> येथे उत्तर प्रदेश मधील हाथरास जिल्ह्यातील खेडेगावात मनीषा वाल्मिकी नांवाच्या दलित परीवार तील मुलींवर उच्च जातीचा काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी अमानुष बलात्कार केला ते गावगुंड फक्त बलात्कार करून शांत बसले नाही तर उलट तिच्या हातापायाची हाडे तोडली जीभ कापली व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
आज ती ह्यात नसली तरी तिने मृत्यू आधी पोलीसांना दिलेल्या जबाणीत सर्व कथन केले त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब त्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांना अटक केली, दलित परीवार तील मनीषा वाल्मिकी फक्त१९ वर्ष वयाची होती ती आपल्या शेतात गुरांना चारा देण्यासाठी जात असताना तिचा पाळतीवर असलेल्या जातीच्या गुंड नि कायद्याची भीती न बाळगता हे कृत्य केले.
उत्तर प्रदेशातील योगी सरकार व केंद्र सरकार या बाबत गंभीर नाही असे आम्ही सर्व महिला शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाने हे निवेदन सादर करत असल्याचे मत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे, तर माजी नगराध्यक्ष उषा वाघ यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणात दोषींवर कारवाई ची मागणी करतात, कंगना रानावत ला वाय दर्जा च संरक्षण देतात परंतु दलित मुलीवर बलात्कार झाला तरी 14 दिवस गुन्हा दाखल होत नाही.
मनीषा वाल्मिकी ला जोपर्यंत न्याय मिळत नाहीत तोपर्यंत शिवसेना तर्फे तिव्र आंदोलन चा इशारा नगराध्यक्षा उषा वाघ यांनी दिला यावेळी उपस्थित धरणगाव उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे, , सुनिता लिडांयत , सुनंदा विसावे, वैशाली पवार, गंगा वाघरे, उषा वाघरे, गोरी वाघरे , आरती चडांले, रेखा वाघरे, सुनीता चौधरी, भारतीताई चौधरी, नेहा प्रकाश पाटील या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.