धरणगावात शिवसेना जिल्हाप्रमुखांची दुचाकी लांबवली

क्राईम धरणगाव

धरणगाव प्रतिनिधी ::> शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी घरासमोरून उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी ८ ऑक्टोबरच्या रात्री लंपास केली.


यासंदर्भात योगराज रामलाल खलाने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्यांचे चुलत मामा गुलाबराव वाघ यांच्या नावावरील दुचाकी (क्रमांक (एमएच.१९-सीटी.४५०२) ही त्यांनी खासगी कामासाठी वापराकरता ताब्यात घेतली होती.

६ ऑक्टोबर रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी जाताना त्यांनी घराबाहेर घरासमोर दुचाकी लावली होती. दरम्यान, पहाटे ५ वाजेच्या सुमारास खलाणे हे घराबाहेर आले. यावेळी दुचाकी चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *