पाळधी ता.धरणगाव प्रतिनिधी ::> तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळांना पालकमंत्री संरक्षण भिंत कवच योजना अंतर्गत 55 शाळांना संरक्षण भिंत मंजूर झाली असून विविध गावांमध्ये कामे सुरू आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून संरक्षण भिंत कवच योजना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रथम जळगाव जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. धरणगाव तालुक्यात 55 शाळांना संरक्षण भिंत योजनेअंतर्गत शाळांमध्ये याचे काम सुरू झाले.
धरणगाव तालुक्यातील कामांना पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाबाबत संबंधित यंत्रणेला सूचना केलेल्या असून कामकाज उत्कृष्ट दर्जाचे होत आहे. सोबत विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.