प्रतिनिधी धरणगाव ::> येथील ५७ वर्षीय सहाय्यक फौजदाराचा कोरोनामुळे रविवारी मध्यरात्री मृत्यू झाला. भगिरथ पांडुरंग नन्नवरे असे कोरोना योद्ध्याचे नाव आहे.
धरणगाव पोलिस स्थानकात कार्यरत असताना १ सप्टेंबरला नन्नवरेंना कोरोनाची लक्षणे जाणवल्याने चाचणी करण्यात आली. त्यात अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर सहाय्यक फौजदार नन्नवरे यांना जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल होते. मात्र, उपचार सुरू असताना १३ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी जळगाव येथे अंत्यविधी झाले. या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी एक ज्येष्ठ व प्रामाणिक सहकारी गमावल्याची भावना व्यक्त केली. दरम्यान, धरणगाव तालुक्यात आतापर्यंत १६३९ रुग्ण झाले. यापैकी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.