प्रतिनिधी धरणगाव ::> सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. यामुळे नोकरी व उच्च शिक्षणात समाजावर अन्याय होईल, असे सूर उमटत आहेत. त्यामुळे कोणत्याही स्थितीत समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी धरणगाव तालुका सकल मराठा समाजाने तहसीलदार नितीन देवरे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र सरकारने भक्कम बाजु मांडू तज्ज्ञ वकिलांची समिती नेमावी. सन २०२० या वर्षी विद्यार्थ्यांना मराठा आरक्षणानुसार शैक्षणिक प्रवेश मिळावा. शासकीय नोकर भरती करताना कोर्टाचा आदेश येईपर्यंत आरक्षणानुसार जागा रिक्त ठेवाव्या.
प्रामुख्याने मराठा आरक्षणासंबधी महाराष्ट्र सरकाराने तातडीने योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा संतप्त झालेला सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. यास महाराष्ट्र शासन जबाबदार राहील.
निवेदन देताना गोपाल पटील, चंदन पाटील, गुलाब मराठे, भीमराज पाटील, लक्ष्मण पाटील, वाल्मीक पाटील, वैभव पाटील, राहुल मराठे, दिनेश भदाणे, कैलास मराठे, ललित मराठे, चेतन जाधव, अमोल पाटील, आनंद पाटील, राहूल पाटील, हरीष पाटील उपस्थित होते. आरक्षण न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.