कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर धरणगाव तालुक्यात थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खाते वाटप

धरणगाव सिटी न्यूज

धरणगाव (गोपाल मराठे) : खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची खरेदी संदर्भात गैरसोय होऊ नये तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरपोच बियाणे व खते देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर धरणगाव तालुका कृषि अधिकारी श्री. अभिनव माळी यांनी दिनांक १२ मंगळवार रोजी सकाळी ११ वा.बांभोरी प्र.चा. या गावातील ३ शेतकरी गटांच्या मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खते वाटप करण्याला हिरवा झेंडा दाखवला.

गटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरपोच बियाने व खते देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी अधिक दक्षता बाळगावी असे आवाहनही कृषी अधिकारी अभिनव माळी यांनी केले. यावेळी कृषि सहाय्यक श्री. आय.बी.पवार, खत विक्री दुकांदार सुनिल मालू व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *