भारतीय जनता युवा मोर्चाची धरणगावात कार्यकारिणी जाहीर

Politicalकट्टा कट्टा धरणगाव

धरणगाव प्रतिनिधी >> धरणगाव शहर भाजप युवा मोर्चा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली. यात भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी भूषण शरद कंखरे यांची निवड करण्यात आली.

भाजयुमोचे शहराध्यक्ष भूषण धनगर यांनी ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील, शिरीष बयस, चंद्रशेखर अत्तरदे, अॅड. संजय महाजन, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शेखर पाटील, प्रकाश सोनवणे, पुनिलाल महाजन, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निर्दोष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्यकारिणीत सरचिटणीस म्हणून शुभम आधार चौधरी, योगेश डिंगबर माळी, शहर उपाध्यक्षपदी अमोल सखाराम महाजन, गणेश सुभाष जाधव, रवींद्र अमृत मराठे, राहुल शिवाजी धनगर, नीलेश रावा महाजन, दर्शन मंगलदास भाटिया यांची निवड करण्यात आली. चिटणीस म्हणून विशाल सुरेश महाजन, गोपाल धुडकू पाटील, सोपान गजानन बडगुजर, हेमराज कडूसिंह बयस, कृष्णा रमेश पाटील, ईश्वर महारु भोई यांची निवड करण्यात आली.

संघटकपदी प्रदीप विनायक महाजन, विशाल विश्वास फुलपगार, नरेश किरण पाटील, सुमित विद्यानंद निळे, विजय रमेश महाजन, रवींद्र सोमनाथ वखरे, अमोल भास्कर महाले, सोशल मीडिया प्रमुख म्हणून हिमालयसिंह सिकरवार तर कार्यकारिणी सदस्य म्हणून योगेश देवालाल चव्हाण, सागर दगडू चौधरी, चेतन गुलाब महाजन, विकास गुलाब धनगर, सौरभ दामोदर येवले, रोहित पाटील, दीपक संतोष महाजन, जिभाऊ रमेश पाटील, सोमनाथ अर्जुन महाजन यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे शहरवासियांसह तालुकाभरातून कौतुक होत आहे.