धरणगावात दोन दुचाकींचा समोरासमोर जोरदार धडक ; दोघे दुचाकीस्वार ठार

क्राईम

धरणगाव प्रतिनिधी ::> धरणगाव येथील कोर्टाजवळ दोन मोटारसायकल यांचा समोरासमोर अपघात झाला असून यात दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले आहे.

मालखेडा (ता. एरंडोल) येथील नाना तुकाराम सोनवणे (वय ४१) हे अमळनेरकडे जात होते. तर धरणगाव येथील कासार गल्लीत राहणारे सागर नाना पाटील (वय ३७) हे अमळनेरकडून येत होते. या दोन्ही दुचाकींची येथील कोर्टासमोर जोरदार धडक झाली.

यात नाना तुकाराम सोनवणे हे जागीच ठार झाले. तर दुसर्‍या दुचाकीवरील सागर पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जळगाव येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हा भीषण अपघात सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *