युवकांनी श्रमदानातून बांधला वनराई बंधारा

Social कट्टा कट्टा नंदुरबार नवापूर

धडगाव प्रतिनिधी ::>पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथील युवकांनी गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर वनराई बंधारा बांधला.

तालुक्यातील उमराणी ब्रुद्रुक गावाजवळून चार नाले वाहतात. या नाल्याचे पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाई जाणवते.

या पार्श्वभूमीवर गावातील युवकांनी या नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

कृषीसेवक वामन पावरा, प्रा. बटेसिंग पावरा, विशाल पावरा, चेतन पावरा, संतोष पावरा, बिभीशन पावरा, ब्रिजलाल पावरा, राजेंद्र पावरा, दिलीप पावरा, राजू साळवे, किसन पावरा, हर्षल पावरा, संजय पावरा, सुरेश पावरा, सायसिंग पावरा, पिंटू पावरा, अनिल पावरा, जयवंत पावरा, सुनिल पावरा, राजेंद्र पावरा, अतुल पावरा, सुकलाल पावरा, सायका पावरा, नितीन पावरा, पिंटा पावरा, उदयसिंग पावरा आदींनी हा उपक्रम राबविला.