चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीची विळ्याने गळा चिरून केली निर्घृण हत्या

नंदुरबार नवापूर माझं खान्देश

| धडगाव प्रतिनिधी |>> चारित्र्याचा संशय घेत पतीने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाकडीकेलीचा महुबारीपाडा येथील रहिवासी असलेल्या पिंगाबाईचे लग्न तिलिखेत (ता.पानसेमल) येथील गणशा वनशा रावतले याच्याशी १६ वर्षांपूर्वी झाले होते; परंतु दोघांत नेहमीच वाद होत. अखेर कंटाळून पिंगाबाई ही माहेरी असलेल्या भाऊ युवराज जंगल्या पटले यांच्याकडे गेली. तिथे जाऊन पती रावताले याने पत्नी पिंगाबाई हिचा विळ्याने गळा कापला. मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने वडील जंगल्या, आई कनीबाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा पिंगाबाई रक्ताच्या थारोळ्यात होती. या प्रकरणी रंगल्या जंगल्या पटले यांच्या फिर्यादीवरून महिलेचा पती गणशा रावताले याच्या विराेधात धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.