धावलघाटाजवळ ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून २१ मजूर जखमी

अपघात क्राईम नंदुरबार नवापूर माझं खान्देश

धडगाव प्रतिनिधी ::>

तालुक्यातील शहादा रस्त्यावरील धावलघाटपासून तीन कीलोमीटर अंतरावर मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. यात तीन मजूर अत्यवस्थ, तर अठरा जणांना मार लागल्याने शहादा येथे हलवण्यात आले आहे.

धडगाव-शहादा रस्त्यावरील धावलघाट येथे तीव्र वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीला झोल बसला. यामुळे ट्राॅली उलटून अपघात झाला. यात सुमारे पंचवीस ते तीस मजूर आपले कौटुंबिक साहित्य घेऊन प्रवास करत होते. हे मजूर वलवाल मोखाचापाडा येथील असल्याचे सांगण्यात आले.

ऊसतोडीसाठी आपल्या कुटुंबासह शहादा येथे जात असताना हा अपघात घडला. त्यामध्ये तीन महिला व एक पुरुष गंभीर झाले तर १८ जणांना कमी प्रमाणात दुखापत झाली आहे. जखमींना जि.प.सदस्य विजयसिंग पराडके, अॅड. छोटू वळवी, रेहमल पावरा, फेरांग्या पावरा यांनी पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे दाखल केले आहे.