अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश ; 15 सप्टेंबरपूर्वी नोंद करण्याचे आवाहन

ऑनलाईन-बिनलाइन धुळे नंदुरबार नवापूर माझं खान्देश

यावल :>> आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्दोदिन, ता. इगतपूरी, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार, अजमेर सौदाणे, ता. बागलाण, मवेशी, ता. अकोला, पिंपळनेर, ता. साक्री, टिटवे, डोगरसांगळी, चणकापुर, शिदेदिगर, धडगाव, अक्कलकुवा येथे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वीमध्ये तसेच इयत्ता 7 वी ते 9 वीच्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणेसाठी संगणकधारीत (ऑनलाईन) http://emrs-registration.herokuapp.com या वेबलिंकवर अर्ज भरण्यात आले आहे.

इयत्ता 5 वी उत्तीर्ण विद्यार्थ्याची इयत्ता 6 वी मध्ये तसेच 7 वी ते 9 वी मध्ये रिक्त असलेल्या जागेवर प्रथमसत्रामधील गुणानुसार निवड करण्यात येणार आहे. त्याकरीता ज्या विद्यार्थ्याचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेले आहे.अशा शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर विद्यार्थ्याचे प्रथम सत्र परीक्षेचे 900 गुणांपैकी प्राप्त गुण ऑनलाईन संगणक प्रणाली mtpss.org.in या संकेतस्थळावर जाऊन दिनांक 15 सप्टेंबर, 2020 पुर्वी अर्ज (गुण) भरणे आवश्यक आहे.

जे विद्यार्थी पालक/शिक्षक/मुख्याध्यापक वरील संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेल्या अर्जामध्ये विहित मुदतीत (15 सप्टेंबर, 2020) पर्यत गुणाची नोंद करणार नाहीत. त्यांचा गुणवत्ता यादी तयार करताना समावेश होणार नाही याची नोंद घ्यावी. त्याकरीता सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेमधील प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती भरावी. अशी सुचना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *