जळगाव >> गेल्या आठ दिवसांपासून घरी न गेलेल्या युवकाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शिवाजीनगरात आढळून आला असून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
अनिल महेंद्रप्रताप शर्मा (वय ३५, रा.अयोध्यानगर) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अजिंठा चौफुलीजवळ लोटगाडीवर नाश्ता विक्रीचा व्यवसाय करीत होता. शिवाजीनगरात सकाळी ६ वाजता वाळू व गिट्टीच्या खचावर अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला.
मृतदेहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचे वडील महेंद्रप्रताप शर्मा व भाचा शासकीय रुग्णालयात आले. त्यांनी मृतदेह ओळखला. तो मृतदेह अनिल शर्मा या युवकाचा असल्याची ओळख पटली. त्याच्या चेहऱ्याला मार बसलेला होता. रक्त येत होते. शरीरावर इतर कोठेही जखमा नव्हत्या.