‘जिल्हा परिषदेत’ हजेरीसाठी एकाच थम्ब इम्प्रेशन मशीनवर होणारी गर्दी कोरोना संसर्गाला देतेय आमंत्रण

Jalgaon जळगाव

जळगाव ::> जिल्हा परिषदेत प्रत्येक विभागात थम्ब इम्प्रेशन मशीन आहे; पण त्या गेल्या अनेक दिवसापासून बंद होत्या. बुधवारी सामान्य प्रशासन विभागाची थम्ब इम्प्रेशन मशीन सुरू झाल्याने सायंकाळी हजेरी नोदविण्यासाठी कर्मचाऱ्याची मोठी गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टसिंगला हरताळ फासला गेला.

जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील मशीन बुधवारी सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांची हजेरीसाठी मोठी रीघ लागली होती. या ठिकाणी प्रत्येक कर्मचारी आपला आधार क्रमांक टाकून हजेरी नोंदविताना दिसला.

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना व जिल्हा परिषदेत कोरोनाचे अनेक रुग्ण सापडल्याने एकाच मशिनवर लागलेल्या रांगा धोकेदायक आहे. हे पाहून शिवसेनेचे गटनेते नानाभाऊ महाजन यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांचेकडे तक्रार केली. तसेच प्रत्येक विभागातील थम्ब इम्प्रेशन मशीन दुरूस्त करण्याची मागणी केली आहे.