जळगावात रिक्षेतून बारा लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव प्रतिनिधी ::>पाळधी गावात गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका व्यापाऱ्यास शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून गुटखा व मालवाहू रिक्षा असा एकूण १२ लाख ७३ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

विकास वसंत सोनवणे (रा. माळीवाडा, पाळधी, ता. धरणगाव) असे अटक केलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोनवणे हा व्यापारी मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे महेश पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार पाटील यांच्यासह अशोक महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनील दामोदरे, मनोज दुसाने, दीपक शिंदे, महेश महाजन, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाने शुक्रवारी पाळधी गावात छापा मारून विकास सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विमल, करमचंद गुटखा व मालवाहू रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत केला.