विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Jalgaon क्राईम जळगाव

जळगाव ::> विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणार्‍यासह बनावट कागदपत्रे करून तिचे घर विकणार्‍याच्या विरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्‍वनाथ जनार्दन सावकारे (वय ५०, रा. अर्जुननगर, हरिविठ्ठलनगर) हा म्हसावद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचर पदावर नोकरीस आहे. त्याचा २०१३ मध्ये एका विधवा महिलेशी परिचय झाला. त्याने या महिलेस लग्नाचे आमिष दिले होते. तो या महिलेस महाबळमध्ये राहण्यासाठी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केले. तिला मारहाण केली. त्याच्यापासून महिलेस दिवस गेल्यानंतर तिला अधिक मारहाण करून तिचा गर्भपात केला. त्यानंतर बनावट कागदपत्रे तयार करून तिचे घर विकले. दरम्यान, सावकारे याचा त्रास वाढल्यामुळे महिलेने सोमवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विश्‍वनाथ सावकारेच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *