एलसीबी पथकाने गावठी कट्टयासह एका आरोपीला केली अटक

क्राईम भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी >> येथे शस्त्रास्त्रांची शोध मोहिम वेगाने सुरू असून आज एलसीबीच्या पथकाने गावठी कट्टयासह अजून एका आरोपीला अटक केली आहे. स्था. गु. शा. पथकातील स.फौ.अशोक महाजन, पो.हे.का. शरीफ काझी, पो.ना.युनुस शेख, पोना किशोर राठोड, पोकाँ रणजित जाधव यांच्या पथकाने आज गावठी कट्टयासह एकाला ताब्यात घेतले आहे.

या पथकाने भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. भाग ६ ली.पे.७४०/२०२० आर्म अँक्ट ३/२५ मधिल आरोपी मोहम्मद इस्माईल मोहम्मद आलम उर्फ शोलु (रा. अयान कॉलनी भुसावळ) यास अटक करून त्यांच्याकडचा गावठी कट्टा ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील कारवाई साठी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दरम्यान, या माध्यमातून पोलिसांची धडक कारवाई सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *