पाचोऱ्यात कोविड सेंटरलगत विनापरवाना औषध विक्री करणाऱ्या मेडिकलवर छापा ; चार लाख ३० हजारांची औषधी जप्त

क्राईम पाचोरा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

रिड जळगाव पाचोरा न्यूज ::> जारगाव हद्दीत नव्याने सुरू झालेल्या कोविड सेंटरलगत विनापरवाना औषधविक्री करणाऱ्या मेडिकलवर छापा टाकून अन्न व औषध प्रशासन विभागाने ४ लाख ३० हजार रुपये किमतीची औषधी जप्त करून ती जळगाव कार्यालयात जमा केली.

नेमक काय आहे प्रकरण ::>
जारगाव चौफुलीलगत ६ दिवसांपूर्वी कोविड सेंटर सुरू झाले. सेंटरच्या बाजूला एका मेडिकलमध्ये परवाना न घेताच औषधविक्री सुरू असल्याची माहिती अन्न व औषधी प्रशासन विभागाला मिळाली होती.

पाचोरा तालुक्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव पाहता काही डॉक्टरांनी एकत्र येत शहरात चार नवीन कोविड सेंटर सुरू केले आहेत.

पाचोरा-भडगाव हायवेलगत जारगाव शिवारात २१ रोजी व्यंकट गोपाळ मंगल कार्यालयात परवानगी घेऊन कोविड सेंटर सुरू केले. त्याला लागून दुसऱ्या दिवशी एक मेडिकलही सुरू झाले.

मेडिकल संचालक शुभम सुनील पाटील यांनी मेडिकल सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो जळगावलाही पाठवला. मात्र परवानगी येण्याअगोदरच औषधीविक्री सुरू केल्याने पाचोरा शहरातील एका व्यक्तीने निनावी फोन करून मुंबई येथील अन्न व औषधी विभागाच्या मुख्य कार्यालयास माहिती दिली.

मुंबईहून तातडीने सूत्र हलल्यानंतर सहायक कमिशनर समाधान साळे (धुळे), जळगाव येथील औषधी निरीक्षक डॉ.एम माणिकराव, सहकारी मिलिंद साळी, समाधान बारी, चंदू सोनार या पथकाने पाचोरा येथील व्यंकट गोपाळ मंगल कार्यालयातील मेडिकलवर छापा टाकून चौकशी केली. तसेच ४ लाख ३० हजार रुपये किमतीची औषधी जप्त केल्याची माहिती डॉ. एम. माणिकराव यांनी सांगितली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *