रुग्णाची वणवण थांबणार ; जनतेकडून खासदार उन्मेश पाटील यांचे आभार : जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळणार दिलासा
जळगाव, भुषण जाधव- जिल्हा कोविड रुग्णालयात पंतप्रधान केयर कडून २३ व्हेंटिलेटर प्राप्त झाले असून यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासदार उन्मेशदादा यांच्या प्रयत्नातून यापूर्वी देखील ३६ व्हेंटिलेटर जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आले होते. आता नव्याने २३ व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आल्याने कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
आकाराने लहान व्हेंटिलेटर
आज जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेले व्हेंटिलेटर आकाराने आधीच्या व्हेंटिलेटर पेक्षा लहान असल्याने त्यांचा गरजे प्रमाणे सामान्य कक्षात त्याचा उपयोग करता येणार आहे. पी एम केयर फंडातून ही अत्याधुनिक आणि आकाराने लहान व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्याने रुग्ण सेवेत अधिक मोठी मदत होईल.अशी माहिती अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.
रुग्णांना दिलासा
सध्या रुग्णाचे प्रमाण वाढत असताना जिल्हा कोविड सेंटर येथे अधिक प्रभावी उपचार मिळण्यास या व्हेंटिलेटर ची मोठी गरज होती. त्यामुळे नवीन व्हेंटिलेटर मुळे रुग्णांना मदत होणार आहे. व्हेंटिलेटर अभावी रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तातडीने केलेल्या प्रयत्नातून नव्याने 23 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याने आरोग्य यंत्रणेने आणि रुग्णांच्या नातेवाइक परिवाराकडून खासदार उन्मेशदादा पाटील यांचे कौतुक करीत आभार व्यक्त केले आहे.