जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

Jalgaon जळगाव

रिड जळगाव टीम ::> सध्याला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ही कमी होत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबरोबरच माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून वेळेत रुग्ण शोधून त्यांचेवर त्वरीत उपचार होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

तर सप्टेंबर महिन्यात 20 हजार 809 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ते 87.87 टक्क्यांवर पोहोचले असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 5 हजार 358 ने कमी झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *