वरिष्ठ लिपिकाला ७०० रुपयांची लाच भोवली ; गुन्हा दाखल

क्राईम पाचोरा पाेलिस

पाचोरा >> येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने ७०० रुपयांची लाच मागितली असता एका तक्रारदाराने शेतमिळकती व घरमिळकतींच्या उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळणेसाठी अर्ज केला होता. मुल्यांकन दाखला देण्याच्या मोबादल्यात लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आज त्याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तक्रारदार यांनी पाचोरा न्यायालयात वारस दाखल्याचे प्रकरण दाखल करणेकामी मौजे लोहारी ता. पाचोरा येथील शेतमिळकती व घरमिळकतींच्या एकुण ८ उताऱ्यांचे मुल्यांकन दाखला मिळणेसाठी तक्रारदार यांनी अर्ज सादर केला असता मुल्यांकन दाखला देण्याच्या मोबादल्यात प्रभारी सहाय्यक दुय्यम उपनिंबधक तथा वरीष्ठा लिपीक ज्ञानदेव साहेबराव चव्हाण (वय-४६) रा. संभाजी नगर पाण्याच्या टाकीजवळ यांनी सातशे रूपयांची लाचेची मागणी केली. आज लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.