शेतकरी विरोधी भुमिका घेणाऱ्या राज्य सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन : खा. उन्मेश पाटील

Politicalकट्टा एरंडोल कट्टा

केळी फळ पिक विमा निकषविरोधात जळगाव येथील ९ तारखेच्या आंदोलनाकरीता एरंडोल येथे समन्वय बैठक संपन्न

एरंडोल, भुषण मनोहर जाधव ::> शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी घेरला गेला आहे. एकीकडे शेतीला मुबलक पाणी असताना दुसरीकडे वीज मिळत नाही. शेकडो शेतकऱ्यांना डीपी जळाल्याने आणि साधे ऑईल नाही म्हणून त्रागा होतो आहे.

शेतकरी एम एस ई बी कार्यालयात चकरा मारून हैराण आहे. हे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी भूमिका सातत्याने घेत असून काहीही गरज नसताना केळी फळ पिक विम्याचे निकष बदलून केळी उत्पादक शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला शिंगाडे मोर्चे काढणारे आता सोंगाडे झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन फिरणारे आता सत्तेत मशगुल असून शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन करून सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली असून मोठ्या संख्येने 9 तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावे.असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे. एरंडोल येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित समन्वय बैठकीत ते बोलत होते.