https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.patrika.com%2Fgorakhpur-news%2Fcm-yogi-adityanath-warn-mafia-to-leave-up-news-in-hindi-1538261%2F&psig=AOvVaw3B9RBlVkhWsqX7xzqIo3BU&ust=1601095893264000&source=images&cd=vfe&ved=0CAIQjRxqFwoTCJC5lJ3Bg-wCFQAAAAAdAAAAABAE

बलत्कार, छेड काढणाऱ्या गुन्हेगारांचे भरचौकात पोस्टर लावणार ; यूपी सरकारची घोषणा!

Politicalकट्टा इंडिया

वृत्तसंस्था लखनऊ ::> उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत चौकशीसाठी ”ऑपरेशन दुराचारी” सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांना कठोर कारवाई करण्यास सांगितले जावे, त्यांची नावे आणि फोटो क्रॉसिंगवर चिकटवण्यात यावीत, असेही निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना थांबण्यासाठी हा धडाकेबाज निर्णय घेतला आहे. महिलांची छेड काढणे, लैंगिक गुन्हे किंवा बलात्काराच्या प्रकरणातील सराईत गुन्हेगारांचे आता भरचौकात पोस्टर लावण्यात येणार आहेत.

हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांना जबाबदार असणार कोण?
महिलांविरुद्ध गुन्ह्याची घटना घडली तर बीट प्रभारी, चौकी प्रभारी, ठाणे प्रभारी व सर्कल अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. अँटी-रोमिओ स्क्वॉडला अधिक सक्रिय व मजबूत करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री योगींनी दिले आहेत.

1 thought on “बलत्कार, छेड काढणाऱ्या गुन्हेगारांचे भरचौकात पोस्टर लावणार ; यूपी सरकारची घोषणा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *