ठाकरे सरकारचे समर्थनार्थ चाळीसगावात शिवसेनेने भगवे झेंडे हातात घेत केले आंदोलन

Politicalकट्टा कट्टा

चाळीसगाव प्रतिनिधी : > महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांचे नेतृत्वात महा विकास आघाडीचे सरकार अत्यंत धैर्याने व समर्थपणे काम करीत असून देशभर थैमान घालत असलेल्या कोरना शी युद्ध करण्यात हे सरकार महाराष्ट्रात सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना भारतीय जनता पार्टीने आज महाराष्ट्रभर आपले अंगण आपले रणांगण या नावाखाली महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले व सरकार अपयशी असल्याचे नाटक करत निषेध केला याचे विरोधात महा विकास आघाडी सरकारच्या समर्थनार्थ व महाराष्ट्रभर लढणाऱ्या सर्व कोरोना योध्द्यांच्या समर्थनार्थ चाळीसगाव शिवसेनेने भगवे झेंडे हातात घेऊन समर्थन आंदोलन करून सरकारचे समर्थन केले आहे भाजपाने सरकारच्या विरोधात आंदोलन करून महाराष्ट्रभर च्या योद्ध्यांच्या धैर्याचे व हीमतीचे खच्चीकरण करण्याचे पाप केले असून त्यांचा हवामान करण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक महाराष्ट्रातील पोलीस बांधव डॉक्टर, नर्सेस, सामाजिक संस्था, पत्रकार हे रात्रंदिवस कोरोना शी लढण्याचा प्रयत्न करीत असून खंबीरपणे काम करीत आहेत मात्र या सगळ्यात महाराष्ट्र कोरोनाशी लढण्यात अयशस्वी होत असल्याचा आरोप करून भारतीय जनता पार्टीने त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते शिवसैनिक सदैव सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून प्रत्यक्ष रणांगणात युद्ध करून लढण्याचे काम आमचे असून अंगणातले नाटक नाही असेही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील चाळीसगाव तालुका प्रमुख रमेश आबा चव्हाण, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव खलाणे, तालूका प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, युवासेना शहर प्रमुख रवींद्र चौधरी, उपशहर प्रमुख शैलेंद्र सातपुते, शाखाप्रमुख रामेश्वर चौधरी, रघुनाथ कोळी, बापू लोणकर, प्रभाकर उगले, रमेश भवर, गणेश भवर, बापू नावडकर, दिनेश विसपुते, निलेश गायके, अण्णा पाटील, प्रदीप पिंगळे, सोमनाथ साळुंखे, संतोष गायकवाड आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *