मुक्ताईनगर तालुक्याच्या वाळू माफियांसोबत अधिकाऱ्यांचे घनिष्ठ सबंध

तापी निषेध मुक्ताईनगर

महसूल विभागाच्या डोळ्यासमोर बिनधास्त अवैध वाळू वाहतूक

वाळूची टंचाई निर्माण करून ज्यादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे. वाळूमाफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.

वाळू माफिया कडून आपल्या वाहनांवर नंबर प्लेट वर नंबर टाकलेला नाही विना नंबर चे वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात वापर RTOकार्यालयाचे नियमाचे उल्लंघन होत आहे.

मुक्ताईनगर प्रतिनिधी कैलास कोळी ::> मुक्ताईनगर तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या नावावर टीचून वाळूची चोरट्या मार्गाने खुलेआम वाहतूक सुरू आहे. वाळू माफियांवर कारवाई करण्यास वाळू चोरी रोखण्यात स्थानिक महसूल प्रशासन अपयशी ठरलेअसून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून वाळू माफियावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

रात्रभर वाळूची वाहतूक सुरू असताना महसूल कर्मचारी व अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील पिप्रीनादू, नायगाव ,पातोडी,बेलसवाडी, अंतुर्ली तापी नदी पात्रातून वाळू उपसा केला जातो. रिगाव, को-हाळा, प्रिप्राळा, भोटा, बोदवड, सुळे हे पूर्णा नदी पात्रातून वाळू वाहतूक केली जात आहे, या नदीपात्रातून दररोज 50 वाहनातून बिनधास्तपणे वाळूची मार्गाने वाहतूक केली जात आहे .

वाळू चोरीमुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत होत असून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. सुमारे पन्नास वाहानातून वाळू वाहतूक केली जात असताना स्थानिक महसूल प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून उलट वाळू माफियांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. वाळू वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. वाळूमाफियांन विरुद्ध तक्रार करणा-यास धमकी सुद्धा देण्याचा प्रकार देखील वाढला आहे. आमच्या विरुद्ध कोणाकडे तक्रार करा अधिकाऱ्यांची नंबर आहेत का? की आम्ही देऊ आमच्यावर कोणतीही कार्यवाही होऊ शकत नाही. असे वाळूमाफिया बिनधास्तपणे सांगतात शहर व ग्रामीण भागात अनेक नवीन बांधकामे सुद्धा सुरू असून वाळू माफियांकडून ठिकाणी वाळूचे साठे करण्यात आले आहेत.

वाळूची टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करून ग्राहकांची लूट केली जात आहे वाळू माफियांचे दलाल दिवसभर महसूल कार्यालय परिसरात फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये उलट,सुलट चर्चा सुरू आहे संध्याकाळी 7 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाहतूक बिनधास्त सुरू असते, वाळूचोरी आळा घालण्यात अथवा कारवाई करण्यास स्थानिक महसूल प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले असून मा,जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे