आदर्श विवाह : चुंचाळे येथे घरातच पार पडला लग्न सोहळा…

Social कट्टा कट्टा यावल

सात पाहुण्याच्या उपस्थितीत जुळल्या सात जन्माच्या गाठी

चुंचाळे ता.यावल > सध्या देशभर कोराना या जिवघेण्या व्हाँयरसच्या विषाणूने हैदोस घातला असून त्यामुळे साऱ्याचे नियोजन कोलमडले असून लाँकडाऊन आणी संचारबंदीमुळे सार्वजनिक उत्सव बंदी घातलेली आहे. या बंदीमुळे काहिना आपले विवाह लाबणीवर टाकले असले तरी बंहूतांश जण सरकारने दिलेल्या आदेशा नुसार घरगुती पद्धतीने विवाह सोहळा उरकुन घेण्यावर भर देत आहेत.

अश्याच पद्धतीने चुंचाळे ता.यावल येथे आज दिनांक १४ मे रोजी अत्यंत साध्या पद्धतीने घरातच विवाह सोहळा पार पडाला माणीक नारायण पाटील( राजपूत ) यांचे पुत्र नरसिंग व नंदीचे खेडगाव ता.पाचोरा येथील कृष्णा नरसिंग पाटील यांची सुकन्या वैष्णवी हे दोघे विवाहाच्या बंधनात अडकले. यावेळी केवळ वधु व वराचे आई वडील मामा ब्राम्हण अशा मोजक्या लोकांची उपस्थिती होती यावेळी फिजीकल डिस्टीनसिंगचे पालन करुन मास्क चा वापर करण्यात आला होता या आदर्श विवाहाचे चुंचाळेसह सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *