चोपडा तालुक्यात २० वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील रहिवासी असलेल्या २० वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. २१ रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चोपडा तालुक्यातील पुनगाव येथील २० वर्षीय तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना तिच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदिप पाटील यांनी तिची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. दुपारी उशिरापर्यंत जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. पुढील तपास सुनिल सोनार हे करीत आहे.