मागासवर्गीयांना मिळणाऱ्या सवलती द्याव्या; तेली समाजबांधवांची मागणी

Social कट्टा कट्टा चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>ओबीसींची जातीनिहाय जनगनणेची मागणी केंद्र सरकारने फेटाळली. त्याबाबत तीव्र नाराजी पसरली असून त्यामुळे नव्याने ही मागणी करण्यात येत आहे, अशा विविध मागण्यांसंदर्भात चोपडा तालुका तेली समाज महासभा या संस्थेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले अाहे की, ओबीसींसाठी ५२ टक्के आरक्षण असावे, हिमाचल प्रदेशात तेली समाजाला मागास जातीत समाविष्ट केले आहे. तोच नियम संपूर्ण देशात लागू करावा, ओबीसीमध्ये आणखी जाती समाविष्ट करू नये, क्रिमीलीअरची अट बंद करावी, ओबीसींमधील जाती व पोट जाती असा भेदभाव असू नये, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन तेली समाजाच्या वतीने नायब तहसीलदार संजय ईखनकर यांनी स्वीकारले. यावेळी नायब तहसीलदारांनी यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *