चोपडा प्रतिनिधी >> तालुक्यातील सुटकार येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोड्या व दुचाकी चोरी करणाऱ्या संशयिताला मंगळवारी ताब्यात घेतले आहे. प्रदीप लोटन कोळी (वय २७ रा.सुटकार ता.चोपडा) असे त्याचे नाव आहे.
सुटकार गावातील युवक जळगाव व चोपडा शहरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाला पाठवले होते. पथकाने त्याला सुटकार येथून ताब्यात घेतले आहे. घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यात त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.