चोपड्यातील युवकाने संकटांचा सामना करत वैद्यकीय शिक्षणात पहिल्याच फेरीत मिळवला प्रवेश

Social कट्टा कट्टा चोपडा

आयुष्यातील वादळ लाटांशी सामना करणारे जिद्दीचे लोभस रूप


चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा येथील रहिवासी असलेल्या जिद्दी तरुणाची ही गोष्ट आहे. घरात जन्मदात्या वडिलांचं रात्री निधन झालं….सकाळीच बारावी सायन्स बायोलॉजी चा पेपर दिला, त्यातही ९० गुण मिळवले, पेपर दिल्यानंतर वडिलांचा अंत्यविधी केला….अशा अनेक दुखांनी आयुष्य सुरु होत. इतकं मोठ आभाळ कोसळल्यानंतरही आपला ध्यास कायम ठेवणारा, NEET2020 परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 575 गुण मिळवून चोपडा तालुक्याची शैक्षणिक क्षेत्रातील अचाट कामगिरी साऱ्या जगाला दाखवून देणारा…. *चि. दिपक सुरेश बोरसे याला त्याच्या गृहराज्य मध्यप्रदेशातील खंडवा येथील गव्हर्मेंट वैद्यकीय महाविद्यालयात MBBSसाठी पहिल्या राऊंडला प्रवेश मिळाला आहे. आर्थिक बाजू सांभाळणारे वडील गेल्यानंतर त्याने जे मिळवलं ते म्हणजे… फक्त 14 हजार रुपयात MBBSप्रवेश…. कोणत्याही परिस्थितीवर जिद्दीने मात करता येते याचा मूर्तीमंत उदाहरण…चि.दीपक आहे. त्याचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत आहे. अशे बोल नातेवाईक शिक्षक परिवाराने रिड जळगाव शी बोलतांना दिले आहे.

दीपक ला पुढील वाटचालीस रिड जळगाव न्यूज परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा.