रब्बी मका शेतकऱ्यांना अनुदान मिळावे यासाठी खासदार रक्षा खडसे यांना निवेदन

Social कट्टा कट्टा चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::> रब्बी मका सन 2019 20 शासनाकडे विक्रीसाठी तालुक्यातील सुमारे 1060 शेतकऱ्यांनी वेळोवेळी निवेदन देऊन, मुदतवाढ देऊन फक्त 260 ते 270 शेतकऱ्यांच्या मका शासनाकडून मोजला गेला व इतर शेतकऱ्यांनी त्यानंतर सदर मका मार्केट व खाजगी व्यापारी यांच्याकडे कमी अधिक भावात पैशांच्या अडचणीमुळे विकावा लागला म्हणजे शासन शेतकऱ्यांना पोट भरू देत नाही व भीक मागू देत नाही तरी नोंद धारकांची मोजणी राहून गेली त्यांना किमान तीनशे ते साडेतीनशे रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान देण्यात यावे व शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणामुळे झालेले नुकसान भरून न्याय मिळवून द्यावा तसेच रब्बी 2019 – 20 व खरीप 2020- 21 दोन्ही वेळेस झालेल्या शेती पीक नुकसानीची शासनाकडून तात्काळ मदत मिळावी तसेच गरताड व परिसरातील 30 ते 40 गावांमध्ये अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतकऱ्यांच्या शेतातील विविध पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे.

पंचनाम्याच्या नुसता फोर्स केला गेला शासकीय कर्मचारी यांनी त्याचे काम केले मात्र शासनाकडून कुठलीच नुकसान भरपाई मिळालेली नाही . रब्बी पिकांचा विमा काढलेला नव्हता तरी हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. अतिपावसामुळे खरिपाचे सुद्धा नुकसान होऊन शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.

शेतकऱ्यांबाबत शासनाचे उदासीन धोरण दिसून येते तरी प्रत्येक गावांमध्ये शेतकरी खरीप पिक विमा काढण्यापासून शेवटच्या दिवसात वेबसाईट बंद या कारणाने वंचित राहिला , करिता विम्याच्या दोन्ही वेळच्या नुकसानीला विम्याची अट न घालता शासनाने मदत करावी.

आता पुढे रबी पिक पेरायला शेतकऱ्यांकडे पैसा नाही व पुढे येणारे सण साजरा करायला देखील पैसे नाहीत . कोरोनाच्या संकटात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याची जाणीव ठेवत राज्य शासनाने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशाप्रकारच्या आशयाचे निवेदन हिम्मतराव पुंडलीक पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी महसूल व रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *