प्रतिनिधी अमळनेर ::> केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे हित जोपासून निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शिवसेनेने केली व मोदी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, तालुका प्रमुख विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, किरण पवार, प्रताप शिंपी, महेश देशमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
