आठवे देव तो करी उपाव। येर तेचि वाव खटपट ॥

Social कट्टा कट्टा चोपडा

चोपडा राजेंद्र पाटील प्रतिनिधी ::> तावसे बु. येथे संपन्न होत असलेल्या वै. मंदोदरी अमृत चौधरी या उभयतांच्या पुण्यतिथी कीर्तन महोत्सवात “आठवे देव तो करी उपाव। येर तेचि वाव खटपट ॥ देवाचे स्मरण होईल असा संसार करावा.

आपला संसार परमार्थ वाटला पाहिजे, माणसं परमार्थात दिसतात पण प्रत्यक्ष संसारातच असतात.ह्या घालमेली मुळे मनुष्य जीव सुखावत नाही. याचा अर्थ संसार करायचा नाही, असे नाही. जोपर्यंत ‘देह’ आहे तोपर्यत देहधर्म हा पाळावाच लागतो. पण तो देहधर्म म्हणजे, कर्म हे शास्त्रसंमत, सद्सद्विवेक जागृत ठेवत केला पाहीजे.

विनाकारणचा शीण , जाणीव पणाचा भावात न वावरणे, जेणेकरून मनुष्य जन्म वाया न जाता ह्याच जन्मात मला देव होता येईल आणि सर्व चराचरा कडे देवत्वाची भावना होईल असे विवेचन श्री. ह.भ. प भरत महाराज चौधरी म्हैसवाडीकर यानी वै. मंदोदरी अमृत चौधरी ह्या उभयतांच्या पुण्यस्मरणानिमीत्तच्या कीर्तन महोत्सवात करत असताना अनेक उदाहरणे देत आपणास देवनाम म्हणजे सुख हवे असेल तर विचारपूर्वक जागे झालो पाहीजे.

या तिन दिवसीय पुण्यस्मरण कीर्तन महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या काला कीर्तन संपन्न करत असताना ह. भ. प. समाधान महाराज रिंगणगावकर “पाहाती गौळणी। तव ती पालथी दुधाणी ॥” ह्या कालाच्या अभंगावर कीर्तन करताना आई वडिलांचे महत्व सांगून भगवान श्रीकृष्णाचे चरित्र सांगीतले. देवच आपले सर्वस्व आहे आणि असा देव प्राप्त करायचा असेल तर आपण आपली भक्ती ही गोपिकांसारखी केली पाहिजे. ह्या कोरोनाच्या महामारितुन बाहेर पडायचे असेल तर सरकारी नियमाची दक्षता घेत भगवन्नाम अट्टाहासाने सतत घेतले पाहिजे आणि ही कोरोना महामारी संपवली पाहिजे.

सदर प्रसंगी ह.भ.प. जगन भाऊ तावसेकर, श्री.वासूदेव अण्णा पाटिल कुरुवेलकर, श्री. भानुदास अण्णा तावसेकर, श्री.ह.भ.प. जनार्दन महाराज दहिवदकर, श्री. विकास महाराज पाटिल, शारंगधर महाराज परभणीकर, हुकुम नाना तावसेकर आणि अन्य भजनी मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होती. अशी माहिती श्री अशोक अमृत चौधरी व श्री धनराज अमृत चौधरी यांनी दिली.व विवेक धनराज चौधरी यांनी सर्व व्यवस्थापन केले.