मांडूळ विक्री, चोपड्याचे दोन्ही संशयित पसार

क्राईम चोपडा धुळे माझं खान्देश

धुळे प्रतिनिधी ::> वलवाडी परिसरातील अयोध्यानगर या ठिकाणी मांडूळ विक्रीची डील वन विभागामुळे फसली. या प्रकरणी अटकेत असलेल्या दोघा तरुणांकडे अजूनही चौकशी सुरू आहे. मांडूळ विक्रेते चार जण होते. यापैकी दोघे चोपड्यातील असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

अयोध्यानगर या ठिकाणी दोन मांडूळ सर्पांची विक्री होण्यापूर्वीच छापा टाकण्यात आला. या प्रकरणी अक्षय चौधरी, अजिंक्य देसले नामक दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघा तरुणांचा सर्प खरेदी व विक्रीत भूमिका नसली तरी त्यांनी डीलसाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

या दोघांच्या जबाबातून चोपडा येथील राकेश बाविस्कर याचे नाव समोर आले आहे. त्याच्या सोबत कोळी नामक अन्य एक जण होता. हे दोघे मोटारसायकलवरून आले होते; परंतु वाहन सोडून त्यांनी पळ काढला. तर अन्य दोन जण चारचाकी वाहनात होते. त्यांनी चकवा देत पळ काढला.

चारचाकीमधून पळ काढणाऱ्यांची माहिती अजून समोर आलेली नाही. तर राकेश व कोळी नामक व्यक्ती दोघे चोपड्याचे आहे. त्याच्या शोधत वनविभागाने चोपडा गाठले; परंतु दोघे ही पसार झाले आहे. अक्षय आणि अजिंक्य यांची मंगळवारी जामिनावर मुक्तता झाली.

मांडूळ विक्रीचे रॅकेट शोधण्यासाठी स्पेशल टीम गठीत
या घटनेच्या तपासासाठी मंगळवारी वन अधिकारी संजय पाटील यांनी विशेष पथक तयार केले आहे. यामध्ये एक अधिकारी व दोन सहायक आहेत. या पथकाने मांडूळची खरेदी-विक्रीसोबत इतरांचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली आहे.