चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील ::>
शहर पोलीस स्टेशन हद्दीत चोरीस गेलेल्या
मोटर सायकलींचा पोलिसांनी कसून शोध घेऊन तीन अट्टल मोटर सायकल चोरट्यांना अटक करून त्यांचेकडून दोन मोटर सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
मोटर सायकल चोरट्यांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
मोटर सायकल चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तुरनर,पो.ना.मधुकर पवार,पो.ना.संतोष पारधी,पो.ना.ज्ञानेश्वर जवागे,पो.ना.प्रदीप राजपूत पो.कॉ.योगेश शिंदे,पो.कॉ. नितीन कापडणे यांनी
तपासाची चक्रे फिरवत मिळालेल्या गोपनीय माहिती वरून राजेश्वर उर्फ राजेश गोरख भिल (वय-२८),शरद भाऊराव भिल (वय-२९) दोन्ही रा.चहार्डी (ता.चोपडा) या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.
तपासात दोघांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी चहार्डी येथील दोन्ही मोटर सायकली चोरी केली असून,त्यापैकी काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना गाडी गुलाब हिंमत कोळी (वय-३२) रा.मांडळ (ता.अमळनेर) यांना तर लाल रंगाची विक्री बजाज प्लॅटीना गाडी पारोळा येथे विक्री केल्याची कबुली पोलिसांना दिली.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरून गुलाब हिंमत कोळी रा.मांडळ (ता.अमळनेर) याचे कडून काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना गाडी पोलिसांनी जप्त केली तसेच दुसरी लाल रंगाची विक्री बजाज प्लॅटीना गाडी देखील पारोळा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आली आहे.
याबाबत राजेश्वर उर्फ राजेश गोरख भिल (वय-२८),शरद भाऊराव भिल (वय-२९) दोन्ही रा.चहार्डी (ता.चोपडा),गुलाब हिंमत कोळी रा. मांडळ (ता.अमळनेर) यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला भाग-५ गुरनं.११५ व १२४ भादवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.