चोपडा तालुक्यातील खरद येथील ५२ वर्षीय इसम बेपत्ता ; शोधणाऱ्यास योग्य बक्षिस

क्राईम चोपडा

चोपडा प्रतिनिधी राजेंद्र पाटील >> चोपडा तालुक्यातील खरद येथील रहिवासी असलेले लोटन व्यंकट साळुंखे वय ५२ गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असून चोपडा शहर पोलीस स्टेशनला याबाबत नोंद करण्यात आली आहे. ते १५ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील खरद येथून चोपडा येथे आले होते. परंतु अद्याप ते खरद या आपल्या घरी परतले नसून त्याबाबत शहर पोलीस स्टेशनला रमण व्यंकट साळुखे यांच्या माहितीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच ज्या व्यक्तीस हे आढळून येतील त्यास योग्य बक्षिस देण्यात येईल असे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.

संपर्क > ९७६७६७४८१७, ७३५०३७२४५७, ७०२८४१२५१६, ८२६३०३३६७५