नाशिकच्या तरुणाने आई-वडिलांचा चिठ्ठीवर नंबर लिहून जळगाव तालुक्यातील चिंचोलीत आत्महत्या

Jalgaon क्राईम

जळगाव :> नाशिकला वास्तव्यास असणाऱ्या तरुणाने तालुक्यातील चिंचोली येथे मावस भाऊ ललित घुगे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून वडिलांच्या भांडणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. रितेश राजेंद्र घुगे वय 20 रा. श्रमिकनगर नाशिक असे मृत तरुणाचे नाव आहे.

रितेश राजेंद्र घुगे याचे घर नाशिक तसेच मेहरूण मध्येही आहे. चिंचोली येथे त्याचा मावसभाऊ राहतो. तो काल सकाळी दहा वाजता नाशिक येथून मोटरसायकलने चिंचोली कडे आला होता. त्याने चाकूने डाव्या हाताची नस कापून आत्महत्याचा प्रयत्‍न केला होता. त्यानंतर विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडून त्याने आत्महत्या केली. मात्र चाकू आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. त्याच्याजवळील MH15 FG 3093 स्कुटीमध्ये त्याच्या वडिलांचा व आईचा नंबर लिहून ठेवलेला होता .

तसेच नाशिक येथून आल्यानंतर त्याने चिंचोली मध्ये प्रवेश केला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलाभ रोहन,पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांनी भेट दिली. सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, अतुल पाटील, किशोर बडगुजर, दीपक चौधरी, भूषण सोनार आदींनी मृतदेह बाहेर काढला . याकामी पोलीस पाटील चिंचोली मुकेश पोळ यांनी मदत केली . दरम्यान मयत रितेशचे मामा राजेंद्र पालवे वय ४७ रा. मुक्ताईनगर यांनी दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *