शहीद जवान यश देशमुख यांना दिला शेवटचा निरोप

Social कट्टा कट्टा चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख यांच्यावर आज दि.२८ नोव्हेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहे. अवघ्या २१ व्या वर्षी यश देशमुख यांना वीरगती प्राप्त झाल्याने पूर्ण गाव शोकमग्न असून पिंपळगाव गावाजवळ असलेल्या मोकळ्या माळरानावर हा अंत्यविधी होत आहे.

शहीद जवान यश देशमुख यांच्यावर आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास शेवटचा निरोप देण्यात आला आहे. हुतात्मा यश देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेकांचे डोळे पाणावले आहेत. जड अंतकरणाने यश देशमुख यांना अग्निडाग देण्यात आला आहे. पिंपळगाव येथे हजारो नागरिकांनी देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे.