चाळीसगाव घाट रोडवरील वाहतूक कोंडी कधी सुटणार ? मार्केट परिसरात सगळे नियम धाब्यावर !

चाळीसगाव

चाळीसगांव (राज देवरे) ::> तालुक्याचा बाजार शनिवारी असल्याने मार्केट परिसरात फार मोठी गर्दी होते त्यामुळे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतुकीची कोंडी सुरूच आहे मात्र, ही कोंडी नागरिक व वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही कोंडी काही केल्या सुटत नसून या कोडींचे करावयाचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर शनिवारी शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. मार्केट यार्ड परिसरात ना कोणाच्या तोंडाला मास ना सोशल डिस्टंसिंग ना वाहतुकीचे नियम सगळे नियम धाब्यावर बसवून सगळे नागरिक वावरतांना दिसत आहे. जर का घाट रोड परिसरात कोरोणाचे रुग्ण वाढले तर नवल वाटायला नको एवढ मात्र नक्की?

तालुक्याचा आठवडे बाजार शनिवारी भरतो. म्हणून शनिवारी वाहतुकीची समस्या फार बिकट आहे मुख्य रस्त्यावरून मार्केट कमिटी, नागद रोड, सदानंद हॉटेल या ठिकाणी फार मोठी वर्दळ असते. बाजारसाठी आलेले नागरिक शहरामध्ये रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर शनिवारी कोंडी होते. या रस्त्याने वाहने नेताना मोठी कसरत करावी लागते. पायी जाणाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन जावे लागते.

अवजड वाहनांना प्रवेश बंद

आठवडे बाजाराच्या दिवशी शहरामधून अवजड वाहनांना प्रवेश बंद करावा. या वाहनांना जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहेत. त्यांना तेथूनच जा-ये करण्यास भाग पाडावे. यामुळेही कोंडी सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

या वेळेत होते सर्वाधिक कोंडी

घाट रोड वरील मार्केट कडे जाणार्‍या रस्त्याकडे सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत व सायंकाळी 3 ते 6 दरम्यान असते. परिणामी शहरातील रस्त्यांवर वाहनांची गर्दी होते. दर शनिवारी असलेली वाहनांची कोंडी मात्र कायमची डोकेदुखी असल्याने नागरिकही त्रस्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *