२४ वर्षीय विवाहित तरुणाने अडीचला केले मतदान अन ३ वाजता गळफास घेत आत्महत्या

आत्महत्या क्राईम चाळीसगाव निवडणूक सिटी न्यूज

चाळीसगाव प्रतिनिधी >> ग्रामपंचायतीसाठी मतदान केल्यानंतर अवघ्या अर्धा तासाने वडगाव लांबे (ता.चाळीसगाव) येथील २४ वर्षीय विवाहित तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली. सचिन डोंगरसिंग घोरपडे असे मृत तरूणाचे नाव आहे.

दुपारी २.३० च्या सुमारास सचिनने मतदान केले. तेथून घरी परतल्यावर त्याने आई व मोठ्या वहिनींना मतदानासाठी पाठवले. यावेळी सचिनचे वडील व भाऊ शेतात गेले होते. तर त्यांची पत्नी दोन वर्षांच्या मुलासह खडके (ता.एरंडोल) येथील माहेरी भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यामुळे घरी कोणीही नव्हते.

यादरम्यान सचिनने दुपारी ३ वाजेच्या सुमारास दरवाजा आतून बंद केला. यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळानंतर आई, वहिनी मतदान करून घरी आल्यानंतर दरवाजा आतून उघडत नसल्याने त्यांना शंका आली.

यानंतर दरवाजा तोडल्यावर आत्महत्येचा भयंकर प्रकार समोर आला. या घटनेने लांबे वडगाव गावात खळबळ उडाली. अजयसिंग घोरपडे यांनी मेहुणबारे पोलिसांना दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद झाली.