चाळीसगावात कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव प्रतिनिधी ::> चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील रहिवासी अल्पभूधारक शेतकरी सुनील भिका पाटील वय ३८, यांनी मित्रमंडळी, सोसायटीचे पिक कर्ज, नातेवाईक तसेच अति पाऊस पडल्याने पैसा नसल्याच्या कारणातून व पत्नीच्या दीर्घ आजाराच्या उपचाराला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या केली.

चाळीसगावातील खाजगी दवाखान्यात पत्नीचा उपचार असताना ते पत्नीला सांगून गेले की, बिल भरण्यासाठी पैसे घेऊन येतो. तर ते गेले तर परत आलेच नाहीत. त्यांनी धुळे-औरंगाबाद बायपास रेल्वे पुलाजवळ दि. १७ रोजी भर पहाटे तीन वाजेच्या सुमारास रेल्वेखाली येऊन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. परिसरात शोककळा व्यक्त केला जात आहे. तसेच शासनाने या कुटुंबाला आधार दिला पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.