चाळीसगाव (प्रतिनिधी) : > तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीच्या पोट निवडणूकीत शाम (आण्णा) नारायण गवळी यांची बहुमताने निवड करण्यात आली. माजी सरपंच श्री. युवराज गुजर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाची दि. २१रोजी निवडणुक घोषित केली होती. यात परिवर्तन पॅनलकडुन श्री.शाम गवळी , सौ.कविता महाजन, सौ.प्रमिला पवार व विरुद्ध गटातुन श्री. किसन जोर्वेकर यांचे अर्ज दाखल झाले होते.
परिवर्तन पॅनलच्या तिन्ही उमेदवारांच्या अर्जावर श्री. किसन जोर्वेकर यांनी हरकत घेतली होती. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गणेश लोखंडे यांनी हरकत फेटाळली व तिघे उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले. यानंतर सौ.प्रमिला पवार व सौ.कविता महाजन यांनी माघार घेतल्याने श्री. शाम गवळी व श्री.किसन जोर्वेकर यांच्यात लढत झाली. यात एकूण १७ सदस्यांनी गोपनीय मतदान केले यात श्री. शाम गवळी यांना १२ मते तर श्री. किसन जोर्वेकर यांना ५ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गणेश लोखंडे यांनी श्री.शाम (आण्णा) नारायण गवळी यांना विजयी घोषित केले.
या निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनलचे प्रमुख पंडित स्वार, जगन्नाथ महाजन, रघुनाथ गुजर यांच्यासह उपसरपंच सौ. वर्षा निलेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदिप स्वार, चंद्रकांत महाजन, युवराज पवार, शांताराम चौधरी, प्रल्हाद महाजन, श्रीमती.अनुसयाबाई काकडे, सौ.प्रमिला गुजर, सौ.उज्वला पाटील, सौ.कविता महाजन , ग्रामविकास अधिकारी सुभाष सूर्यवंशी, तलाठी श्री. संजय कणाके, ग्रामस्थ विजय पवार, सतिश महाजन, प्रदिप पाटील, निलेश पाटील व सर्व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.